ग्राम सुरक्षा यंत्रणेचे वैशिष्ट्ये
ग्राम सुरक्षा यंत्रणा नेमकी काय आहे?
ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामिण भागासाठी सुरू करण्यात आली आहे. गेल्या १३ वर्षात हजारो गावात सदर यंत्रणा कार्यान्वित आहे. संपुर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने संकट काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकु जातो.
- घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
- गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळणे.
- अफवांना आळा घालणे.
- प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
- पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.
ग्रामस्थ ग्राम सुरक्षा यंत्रणेचा (18002703600) वापर विविध स्तरावर खालील प्रमाणे करू शकतात.
| ग्रामसभा | सरकारी योजना | लसीकरण | पाणीपुरवठा |
| शाळेच्या सूचना | घरपटी वसुली | पाणीपट्टी वसुली | तातडीच्या सूचना |
| राशन वाटप | सरकारी कार्यक्रम | चोरी / दरोडा | मुलं/मुली हरवणे |
| पिसाळलेला कुत्रा | बिबट्याचा हल्ला | भूकंप | महापूर |
| महिलांची छेडछाड | पिकाची चोरी | वाहन चोरी | आग / वनवा |
| अपघात | अति वृष्टी | मृत्यूची घटना | सर्प दंश |
| सतर्कतेचे इशारे | मदत कार्य | पोलीस दल | सामान्य प्रशासन |
महाराष्ट्र राज्यातील ग्रामसुरक्षा यंत्रणेची स्थिती
- सहभागी एकूण जिल्हे = 07
- सहभागी एकूण पोलीस स्टेशन = ४३८
- सहभागी सरकारी कार्यालय = १४९
- सहभागी गावांची संख्या = ६८७०
- सहभागी नागरिकांची संख्या = ७० लाख
- ग्राम सुरक्षा यंत्रणेचा राज्यात आजवर झालेला वापर = १,७०,००० वेळा
ग्राम सुरक्षा यंत्रणा – नोंदणी नंबर
ग्राम सुरक्षा यंत्रणा अँपच्या माध्यमातून आपल्या गावातील सुरक्षेची नोंदणी आता सोप्या पद्धतीने करा. या अँपद्वारे नागरिकांना त्यांचा नंबर सहज नोंदवता येतो आणि ग्राम सुरक्षेशी संबंधित माहिती वेळेवर मिळते. सुरक्षित गाव, सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी हे अँप उपयुक्त ठरेल.
नंबर नोंदणी : 9595006650
1. सर्वसाधारण माहिती
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात मानवाने परस्परांशी संपर्कासाठी नानाविध साधने बनविली व त्याचा वापर करून मानव प्रगतीही करत आहे. संपर्काची कधी नव्हे एवढी प्रचंड साधने आज जगात उपलब्ध असुन सुध्दा प्रत्यक्ष संकट काळात म्हणजे आग, चोरी, दरोडा, लहान मुल हरविणे, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतातील पिकाची चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राणी, बिबट्या, तरस, लांडगा यांचा हल्ला आदी घटनांमध्ये तातडीने जवळपास असणाऱ्या नागरिकांशी तत्काळ संपर्क साधुन मदत मागणे आजच्या या उपलब्ध संपर्क साधनांद्वारे शक्य होत नाही. ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामिण भागासाठी सुरू करण्यात आली आहे. गेल्या १३ वर्षात हजारो गावात सदर यंत्रणा कार्यान्वित आहे. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर आपल्या गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेत नोंदवुन यंत्रणा वापरत आहेत. संपुर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने संकट काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकु जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतांनाच तीची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
नाही. ग्राम सुरक्षा दल व ग्रामसुरक्षा यंत्रणा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळते.
गावातील कार्यक्रम/घटना विना विलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळतात.
अफवांना आळा घालणे शक्य होते.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येतो.
पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
* संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा.
* गावासाठी यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत.
* संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 270 3600.
* यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
* संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
* दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबध्द मदत करता येते.
* नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात.
* नियमाबाह्य दिलेले संदेश/अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
* एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
* वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो
* घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते.
* संदेश पुढील १ तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय.
* कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
* चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप ब्लॅक लिस्ट होतात.
* गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
* सरकारी कार्यालये/पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य
ग्राम सुरक्षा यंत्रणेचा आपत्कालीन संपर्क नं. 1800 270 3600
ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे कॉल कसा करावा याच्या सरावासाठी नंबर 9595084943
ग्राम सुरक्षा यंत्रणेचे नियम / अटी 022 48931236/9595006650 या नंबरवर उपलब्ध
ग्राम सुरक्षा यंत्रणेतुन नंबर रद्द करण्यासाठी मो. नंबर 08047103710
२. यंत्रणा सुरू करणेबाबत
प्रत्येक गावात पोलीसस्टेशन कडून ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांची एकत्रित सभा घेवुन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते. पंचायत समिती कार्यालयात स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक व गट विकास अधिकारी यांचे उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांना ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते
३. यंत्रणेत सहभागी होणेबाबत
ज्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे त्या गावातील प्रत्येक नागरिक ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी होवू शकतो. आपल्या गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे किंवा नाही यासाठी ग्रामपंचायत कार्यालय किंवा गावातील पोलीस पाटील यांचे कडे संपर्क करावा.
गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असेल तर ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्रामपंचायतने ठरवुन दिलेल्या व्यक्तींशी संपर्क करून आपला मोचाईल नंबर ग्रामसुरक्षा यंत्रणेत नोंदवुन घ्यावा.